कुपवाड : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये राजकीय अनिश्चितता वाढताना दिसत आहे. उमेदवार यादीत काही प्रमुख नावे वगळण्यात आल्याने संभाव्य बंडखोरी आणि पक्षबदलाच्या चर्चांना जोर आला आहे.
प्रभाग क्रमांक 1 मधून मोहन बापू जाधव, अभिजित परिट आणि संदीप तुपे यांची नावे उमेदवार यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच ओबीसी गटातून पायल गोसावी आणि माया गडदे यांच्या नावाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
दरम्यान, संदीप तुपे आणि आकाश गोसावी यांची वाढती लोकप्रियता आणि जनसंपर्क पाहता त्यांना महाविकास आघाडी तसेच शिवसेना (शिंदे गट) कडून संपर्क केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये माजी नगरसेवक गजानन मगदूम यांचे नाव वगळण्यात आल्याने ते पुढील भूमिका काय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते महाविकास आघाडीकडे वळणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
भाजपकडून अख्तर मुजावर, सिद्राम दलवाई, महेंद्र पाटील यांच्यासह काही इच्छुकांची नावे यादीत नसल्याने कुपवाडमधील राजकीय चित्र सध्या सस्पेन्सफुल बनले आहे.
हेही वाचा: जत तालुक्यातील महिला डॉक्टरचा वरिष्ठांकडून मानसिक छळ; पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










