सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असून नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, विनापरवाना मोटारसायकल रॅली काढणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणूक काळात कार्यरत असलेल्या आचारसंहिता कक्षाकडे आतापर्यंत एकूण सहा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित चार तक्रारींचा तपास करून त्यांचा निपटारा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत १५९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याच कालावधीत २७.६५ लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले असून, दोन कोयते देखील पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असून, लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत प्रेस मालक व संबंधित घटकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. निवडणूक काळात आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; मिरजेत मैत्रीपूर्ण लढत, सांगली-कुपवाडमध्ये नकार.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










