सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत तणाव उघड झाला असून, उमेदवारी डावलल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या युवराज बावडेकर यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षातील नाराजी उफाळून आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटाची वाट धरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना युवराज बावडेकर म्हणाले की, प्रभाग क्रमांक 14 हा मोठा असून येथील नागरी समस्या प्रत्यक्ष अनुभवातून परिचित आहेत. येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर लढवली जाणार असून, मतदारांचा विश्वास आमच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवत आहे. प्रभागातील सर्व मतदार बंधू-भगिनी विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपासमोर शिवसेना शिंदे गटाचे थेट आव्हान उभे राहिले असून, महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हेही वाचा: कडेगाव तालुक्यात भरदिवसा बैलगाड्यांच्या मागे लागला बिबट्या; नागरिकांकडून उपाययोजनेची मागणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










