देवराष्ट्रे : चिंचणी–मोहिते–वडगाव रस्त्यावर सोमवारी सकाळच्या सुमारास ऊसतोडीसाठी निघालेल्या कामगारांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊसतोड कामगार बैलगाड्यांद्वारे कामासाठी निघाले असताना रस्त्यालगत अचानक बिबट्या आला. या वेळी कामगारांनी घाबरून आरडाओरड केल्याचे सांगण्यात येते. काही अंतरापर्यंत बिबट्या त्यांचा पाठलाग करत होता असे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाकडून प्राथमिक माहितीनुसार, संबंधित परिसरात बिबट्याचे बछडे असण्याची शक्यता असून, संरक्षणाच्या हेतूने बिबट्या मागे लागला असू शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर काही ऊसतोड कामगारांनी भीतीपोटी काम थांबवले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. वनविभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा: दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस जन्मठेप; विटा न्यायालयाचा निकाल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










