सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नववर्ष 2026 च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या संदेशातून त्यांनी सरत्या वर्षातील संसदीय कामकाजाचा आढावा घेत, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर संसदेत मांडलेल्या भूमिकेचा उल्लेख केला आहे.
या संदेशात खासदार विशाल पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत शेतकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. काही मुद्द्यांवर सकारात्मक प्रगती झाली असून काही विषय अद्याप प्रक्रियेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरत्या वर्षात राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शक्तीपीठ महामार्ग, अलमट्टी धरणाची उंचीवाढ यांसारख्या विषयांमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा उल्लेख करत, अशा परिस्थितीत शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. खासदार निधीतून मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचाही त्यांनी संदर्भ दिला आहे.
याशिवाय बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, जीएसटी प्रणाली, खासगीकरण तसेच देशातील काही संवेदनशील विषयांवर संसदेत मांडलेल्या मुद्द्यांचाही या संदेशात उल्लेख करण्यात आला आहे. आगामी काळातही जनतेच्या हक्कांसाठी काम सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे.
नववर्षाच्या निमित्ताने दिलेला हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, त्यावर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
खासदार विशाल पाटील यांनी नववर्षाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केलेली अधिकृत पोस्ट खाली पहा :
हेही वाचा: ईव्हीएम सुरक्षिततेपासून मतदान केंद्रांपर्यंत; सांगलीत मुख्य निवडणूक निरीक्षकांची प्रत्यक्ष पाहणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










