सांगली : सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Walchand College of Engineering) मधील बी.टेक. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची HCL Tech या आघाडीच्या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि संगणक अभियांत्रिकी (CSE) शाखेतील विद्यार्थी सहभागी असून, ही निवड त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीतील एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून गोपाल निवृत्ती ढगे, निलेश संपत देसाई, गीता संतोष कोरे, अदिराज कैलास गावळे आणि गायत्री दीपक दाभाडे यांची निवड झाली आहे. आयटी शाखेतून आर्यन बाबर, रचित भट आणि गोपाल दत्ता वाघ, तर संगणक अभियांत्रिकी (CSE) शाखेतून अथर्व इंगळे यांची HCL Tech मध्ये इंटर्नशिपसाठी निवड करण्यात आली आहे.
महाविद्यालय प्रशासन, संचालक, प्राध्यापक वर्ग आणि करिअर डेव्हलपमेंट सेल (CDC) यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, वालचंद कॉलेजची उद्योगविश्वाशी असलेली भक्कम शैक्षणिक परंपरा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता यामुळे अशा संधी उपलब्ध होत असल्याचे कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: खासदार विशाल पाटील यांचा नववर्ष संदेश देणारी सोशल मीडिया पोस्ट चर्चेत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










