सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी सांगलीतील खरे मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीची (BJP) पूर्वतयारी बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसंदर्भात पक्षस्तरावर चर्चा करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने संघटनात्मक बाबी, उमेदवार समन्वय तसेच जनतेशी संवाद साधण्याबाबत विविध मुद्द्यांवर उपस्थितांनी विचारविनिमय केल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीस मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री सुरेश खाडे, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, प्रदेश कार्यकारणी सदस्या नीताताई केळकर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व भाजपा नेते पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, अधिकृत उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून तयारीच्या बैठका घेतल्या जात आहेत.
हेही वाचा: वालचंद कॉलेजच्या बी.टेक. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची HCL Tech मध्ये इंटर्नशिपसाठी निवड.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










