सांगली : खरीप पणन हंगाम २०२५–२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेत धान व भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अधिकृतरीत्या ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
आधी शेतकरी नोंदणीसाठीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्यातील विविध भागांतून शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच कृषी संघटनांकडून मुदतवाढीची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणी प्रक्रियेस अतिरिक्त कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने दिलेल्या या मुदतवाढीच्या कालावधीत संबंधित यंत्रणांनी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून शेतकरी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अद्याप नोंदणी न केलेल्या धान व भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
खरीप हंगामात धान व भरडधान्य खरेदीसाठी पात्र ठरण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










