सांगली : सांगली शहरातील विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात गेल्या चार दिवसांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी पाणी मिळणे कठीण झाले असून अनेक कुटुंबांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.
परिसरातील अनेक ठिकाणी चौकाचौकात नाणे टाकून पाणी मिळणाऱ्या मशीनवर नागरिक पिण्यासाठी पैसे देऊन पाणी आणताना दिसत आहेत. मात्र आजच्या घडीला बहुतेक घरांमध्ये पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याची सवय राहिलेली नाही. त्यामुळे पाण्याच्या टाकीतील साठा संपल्यानंतर स्वयंपाक, स्वच्छता, आंघोळ यांसारख्या दैनंदिन कामांसाठी पाणी मिळवणे अवघड होत आहे.
ज्या घरांमध्ये खासगी बोअरवेलची सोय आहे, त्या नागरिकांना तुलनेने दिलासा मिळत असला तरी जे पूर्णपणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत, त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार कुटुंबांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
पाणीपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पाणी ही मूलभूत गरज असल्याने संबंधित यंत्रणांनी ही समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा: मी एकट्यान मतदान केल नाही तर काय होतय? माझ्या एका मतान काय बदलणार आहे….
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










