Sangli Election : मी एकट्यान मतदान केल नाही तर काय होतय? माझ्या एका मतान काय बदलणार आहे…

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
मतदानाचा हक्क बजावताना नागरिक | प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

सांगली : खर सांगायच तर हा प्रश्न अनेकांच्या मनात कधी ना कधी येतो.

“अरे, मी एकटा मतदानाला नाही गेलो तर काय बिघडत?”

“इतके हजार लोक आहेत, माझ्या एका मतान काय फरक पडणार?”

हे विचार करण चुकीच नाही. आपण सगळेच कधी ना कधी अस म्हणतो.

पण जरा शांतपणे विचार केला, तर चित्र थोड वेगळ दिसत.

महानगरपालिका निवडणूक आहे. इथे प्रभाग छोटे असतात. अशा ठिकाणी निकाल कधी कधी १००–२०० मतांनीही फिरतो.

म्हणजे आपण, आपले कुटुंबीय, मित्र, शेजारी — एवढ्यांनी जरी मतदान केल नाही, तरी निकाल बदलू शकतो.

पण आपण काय म्हणतो?

“सगळे करतायतच ना, मग मी नाही गेलो तर काय होतय.”

असाच विचार जर सगळ्यांनी केला, तर मग मतदान करणार कोण?

आणखी एक गोष्ट —

रस्ता खराब आहे

पाणी वेळेवर येत नाही

रस्त्यावर लाईट नाही

महानगरपालिका वेळेवर कचरा उचलत नाही

हे सगळ चार चौघात बोलताना मात्र आपण कधी म्हणत नाही —

“मी एकट्यान बोलून काय होणार?”

महानगरपालिका रस्ते, पाणी, लाईट, कचरा सगळ नीट करेल…

पण ते सांगणारा, विचारणारा, प्रश्न करणारा कोणीतरी पाहिजे ना — आपल्यातलाच?

अनेक लोक म्हणतात, “सगळे नेते सारखेच असतात.”

ठीक आहे, असतीलही.

पण त्यातला कोण थोडा बरा, कोण आपल्यासाठी काम करेल — हा प्रश्न एकदा तरी स्वतःला विचारा.

कुणालातरी मतदान करण म्हणजे त्याच्या बाजूने उभ राहण नाही.

मतदान करण म्हणजे आपल्या समस्या सोडवण्यासाठी कुणाला तरी पुढ करण.

आणि सगळ्यात महत्त्वाच —

लोकशाहीत प्रत्येकजण “एकटा”च असतो.

हजार लोक म्हणजे हजार “एकटे” मतदार.

जर प्रत्येकान “मी एकट्यान मतदान नाही केल तर काय फरक पडणार?” असा विचार केला,

तर शेवटी फरक पाडतो तोच — जो गेला आणि बटण दाबून आला.

म्हणून प्रश्न हा नाही की —

“माझ्या एका मतान काय बदलणार आहे?”

खरा प्रश्न हा आहे

मी माझ मत का वाया घालवू?”

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आहे.

सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत थोडा वेळ काढून मतदान नक्की करा.

तुमच एक मत खूप मौल्यवान आहे

ते असच वाया जाऊ देऊ नका.

हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूक लढवणार.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा