Sangli Water Issue Update : विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात चार दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात चार दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू | प्रत्यक्ष छायाचित्र – Sangli Today

सांगल : विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात गेल्या चार दिवसांपासून नळाद्वारे बंद असलेला पाणीपुरवठा आज रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आज सकाळी ८:५१ वाजता पाणीपुरवठा खंडित असल्याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, रात्री उशिरा परिसरात पाणी येण्यास सुरुवात झाली. पाणीपुरवठा सुरू झाल्याने पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मात्र चार दिवस चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना पर्यायी पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: सांगली बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईलची चोरी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा