सांगली : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या बालमहोत्सवाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
हा बालमहोत्सव जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व सुदंराबाई मालु मुलींचे निरीक्षण गृह, सांगली येथे पार पडणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे या संदर्भातील माहिती दिली आहे.
या बाल महोत्सवात जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्था तसेच शाळांमधील मुला-मुलींसाठी बाल मेळावा, क्रीडा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुला-मुलींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सांघिक खेळ तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
बाल मेळाव्यात मैदानी खेळ, बैठे खेळ, सांस्कृतिक उपक्रम, गणित प्रदर्शन, रोबोटिक सेन्सर व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आधारित उपक्रम, तसेच बालगृहातील मुला-मुलींनी तयार केलेल्या विविध वस्तू, पणत्या, आकाशकंदील आणि सजावटी साहित्यांचे प्रदर्शनही ठेवण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या कलागुणांना व कौशल्यांना व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाला सुरुवात; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










