सांगली : सोन्या-चांदीचे कॉईन देण्याचे आमिष दाखवून 8 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुधीर आनंदराव खराडे यांनी दोन पुरुष व एका महिलेविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी खराडे यांना सोन्या-चांदीचे कॉईन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 27 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी संशयितांना 8 लाख रुपये दिले. त्यानंतर संबंधितांनी दिलेले सोने तपासणीदरम्यान बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने संशयितांशी संपर्क साधून चौकशी केली तसेच पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर खराडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
संजयनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा: मैदानावर उतरली जिद्द; सांगलीत दिव्यांग खेळाडूंनी दाखवली आत्मविश्वासाची ताकद.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










