सांगली : सांगली जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर तीन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या कार्यशाळेचा उद्देश प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता वाढवणे आणि माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करणे हा होता.
या कार्यशाळेत माहिती अधिकार कायद्यांतर्गत जनमाहिती अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, माहिती अर्जांची प्रक्रिया, तसेच प्रथम अपील अर्जांची हाताळणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. माहिती अर्जांवर वेळेत कार्यवाही करणे, कायद्यातील तरतुदींचे पालन आणि दप्तर व्यवस्थापन या बाबींवर विशेष भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायद्यातील विविध कलमांची सखोल माहिती देण्यात आली असून, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांबाबत पारदर्शक व नियमबद्ध कार्यपद्धती कशी राबवावी, यावरही चर्चा करण्यात आली. सुशासन आणि प्रशासनातील गतिमानता वाढवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय विशेष कार्यशाळेमुळे जिल्हा परिषदेमधील प्रशासकीय प्रक्रिया अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे मत जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा: मतदारांसाठी ‘मताधिकार’ ॲप उपयुक्त; नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती एका क्लिकवर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










