सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांचा वापर राजकीय प्रचारासाठी करू नये, तसेच धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासनाने दिले आहेत.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील कृष्णा मॅरेज हॉल येथे आयोजित बैठकीत राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आचारसंहितेच्या पालनाबाबत सूचना देण्यात आल्या. निवडणूक काळात कोणत्याही स्वरूपाचा प्रचार करताना कायदेशीर मर्यादांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत परवानगीशिवाय सभा, मिरवणूक किंवा कार्यक्रम आयोजित करू नयेत, वैयक्तिक टीका-टिप्पणी टाळावी, तसेच ध्वनी व वेळेच्या मर्यादांचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, द्वेष पसरवणाऱ्या किंवा आचारसंहितेला बाधा आणणाऱ्या पोस्ट केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला.
मतदान प्रक्रियेच्या दिवशी मतदान कक्षात मोबाईल फोन नेण्यास मनाई असून, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे, दारू किंवा अन्य आमिषांचा वापर केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच मतमोजणीनंतर कोणत्याही उमेदवाराला विजय मिरवणूक काढण्यास परवानगी नसल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक–युवतींसाठी मैदानी व लेखी सराव स्पर्धेचे आयोजन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










