सांगली : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक व युवतींसाठी सांगली जिल्ह्यात मैदानी व लेखी सराव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन आमदार रोहित दादा पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
पोलीस भरतीच्या तयारीदरम्यान उमेदवारांना आपल्या शारीरिक व लेखी तयारीचा सराव करता यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, मैदानी स्पर्धा IRDF (चिप) प्रणालीद्वारे घेतल्या जाणार असून, मुला-मुलींसाठी स्वतंत्र बक्षीस गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी 50 रुपये ठेवण्यात आली आहे.
ही स्पर्धा सैनिक शाळेचे मैदान, पाण्याच्या टाकीजवळ, मणेराजुरी रोड, दत्त माळ, तासगाव येथे सकाळी 6 वाजता सुरू होणार असून, सहभागी उमेदवारांनी वेळेआधी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधारकार्ड (मूळ) सोबत आणणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना
ही स्पर्धा पोलीस भरतीची अधिकृत प्रक्रिया नसून,
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी सराव व फिटनेस तसेच लेखी तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आयोजित उपक्रम आहे, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक असून, जागा मर्यादित असल्याची माहिती देण्यात आली आहे. नोंदणी, नियम व अटी तसेच आयोजनासंबंधी अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.
स्पर्धेचा तपशील
दिनांक: सोमवार, 12 जानेवारी 2026
वेळ: सकाळी 6 वाजता
ठिकाण: सैनिक शाळेचे मैदान, तासगाव
प्रवेश फी: ₹50
नोंदणी लिंक
https://forms.gle/1nmcDMRRa1brr8TT9
अधिक माहितीसाठी संपर्क
स्वप्निल पवार – 86683 06457 / 95796 56662
आदित्य जाधव – 77218 66569
सागर लिंबळे – 79728 06892
हेही वाचा: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात 50 पथनाट्यांद्वारे मतदार जनजागृती.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; २८ ऑक्टोबरनंतर भाव आणखी कोसळणार की तेजी येणार? खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे दर (२५ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Maharashtra Weather: राज्यात धो-धो पाऊस? २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हवामानात मोठा उलटफेर; उकाड्यात पावसाची चाहूल









