सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची चाकूने भोसकून व डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव चैतन्य अप्पासाहेब तांदळे (वय 17, रा. शामरावनगर, सांगली) असे आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य तांदळे हा रात्री त्याच्या एका मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याच्याच ओळखीच्या काही व्यक्तींशी त्याचा किरकोळ वाद झाला. वादानंतर काही वेळाने संबंधित व्यक्ती इतर दोघांना घेऊन पुन्हा घटनास्थळी आल्या.
यावेळी परिस्थिती चिघळली, चैतन्य पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. डोके, मान व पोटावर वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी विनोद डांगे (वय 32, रा. शामरावनगर, सांगली) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. उर्वरित तीन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्या शोधासाठी सांगली शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.
हेही वाचा: सांगलीवाडीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाल्याचा सव्वा 30 लाखांचा साठा जप्त; एका तरुणास अटक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










