सांगली : जिल्ह्यातील काही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून कथित छळाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने, या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय महिला समितीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स (MAGMO) संघटनेने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून, या तक्रारी महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मान, मानसिक सुरक्षितता आणि कार्यस्थळी सुरक्षित वातावरणाशी थेट संबंधित आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
निवेदनानुसार, या तक्रारींशी संबंधित आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध असून, चौकशी जर स्थानिक किंवा कनिष्ठ स्तरावर करण्यात आली, तर तिच्या निष्पक्षतेबाबत शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण चौकशी ही उच्चस्तरीय महिला समितीमार्फतच करण्यात यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.
तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा, मानसिक सुरक्षितता आणि सेवासंबंधी हितसंबंध अबाधित राहतील, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांना कार्यस्थळी सुरक्षितता व न्याय मिळणे हे प्रशासनाचे नैतिक तसेच संविधानिक दायित्व असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, राज्य सहसचिव डॉ. नितीन चिवटे व राज्य सहसचिव डॉ. अभिजित सांगलीकर यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग परिसरातील मद्यविक्रीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










