सांगली : रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली आणि उषःकाल हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, माधवनगर रोड, सांगली येथे होणार आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास उषःकाल हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असून, आयुष्यभरासाठी रक्तदाता किंवा त्याच्या कुटुंबासाठी एक युनिट रक्ताची सुविधा मिळणार आहे. तसेच रक्तदात्याच्या जवळच्या नातेवाईक व मित्रांसाठी रक्तपेढीकडून आवश्यक सुविधा व सवलती दिल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सांगलीतील अधिकाधिक नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.
हेही वाचा: पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मतदारांना आवाहन.
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी









