सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.
मतदान हा लोकशाहीतील महत्त्वाचा हक्क आणि कर्तव्य असल्याचे सांगत, प्रत्येक पात्र मतदाराने आपले मत नोंदवून लोकशाहीच्या उत्सवाचा भाग व्हावे, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनीही सर्व सांगलीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शांततेत, निर्भय वातावरणात आणि कोणत्याही दबावाशिवाय मतदान करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
हेही वाचा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










