सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना, प्रचार समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कोणताही नवीन आदेश जारी केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR) यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जाहीर प्रचार संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भातील आदेश हा नवीन नसून, तो १४ फेब्रुवारी २०१२ रोजीच राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेला आहे.
सध्या समाजमाध्यमे व काही माध्यमांत प्रचार समाप्तीनंतर घरोघरी प्रचारासाठी नवीन नियम लागू करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र, ते वृत्त वस्तुस्थितीला धरून नसल्याचे MahaDGIPR कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
२०१२ च्या आदेशानुसार, जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या बाहेर मतदारांना भेटून किंवा घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. मात्र, या काळात माईकचा वापर करता येणार नाही तसेच उमेदवारांना समूहाने फिरण्यास मनाई आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या स्पष्टिकरणामुळे प्रचार नियमांबाबत पसरलेल्या गैरसमजांवर पडदा पडला असून, मतदारांनी व उमेदवारांनी अधिकृत आदेशांनुसारच वर्तन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: आज १५ जानेवारी रोजी सांगलीत मतदान सुरू; मागील निवडणुकीतीचा निकाल, मतदान टक्केवारी व आकडेवारीवर एक नजर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










