तासगाव : तासगाव–मणेराजुरी रस्त्यावरील चिंचणी फाटा परिसरात तासगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील तरुणाला अटक करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत दीड लाख रुपयांच्या आसपास आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचणी फाटा परिसरात एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद हालचाल करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले.
अधिक चौकशीत संबंधित तरुणाचे नाव सुजल रामचंद्र धनावडे (वय २०, रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) असल्याचे स्पष्ट झाले. तपासात त्याने ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंदवा येथून आणल्याची माहिती पोलिसांना दिली. याच प्रकरणात दुसरे पिस्तूल सातारा जिल्ह्यातील त्याच्या राहत्या घरातून हस्तगत करण्यात आले आहे.
या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शस्त्रांचा पुरवठा कुठून व कोणासाठी करण्यात येणार होता, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई तासगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










