सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासक काळात राबविण्यात आलेल्या कामकाजाचा विभागनिहाय व सांख्यिकीय आढावा महापालिका आयुक्त सत्यम गांधी (IAS) यांनी मंगळवारी विशेष पत्रकार परिषदेत सादर केला. ही परिषद महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडली.
या सादरीकरणात प्रशासक काळात सामान्य प्रशासन, आस्थापना, वित्त, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, नगररचना, आरोग्य, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, अग्निशमन, माहिती तंत्रज्ञान, कर वसुली, उद्यान, वाहतूक तसेच निवडणूक विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या कामकाजाचा एकत्रित लेखाजोखा मांडण्यात आला.
आयुक्त गांधी यांनी सांगितले की, प्रशासक काळात निर्णयप्रक्रियेत नियमबद्धता, ई-गव्हर्नन्सचा वापर, फाईल ट्रॅकिंग व वेळबद्ध कामकाज यांवर भर देण्यात आला. सर्व विभागांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व राखून प्रशासन चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी २०२५–२६ मधील सार्वत्रिक महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावाही मांडण्यात आला. निवडणूक विभागासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया नियोजित पद्धतीने पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.
कर्मचारी कल्याणाबाबत बोलताना, दीर्घकाळ प्रलंबित पदोन्नती, अनुकंपा नियुक्त्या व सेवाविषयक प्रकरणे नियमांनुसार पूर्ण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. तसेच HRMS, सेवा पुस्तके अद्ययावत करणे, वेतन-भत्ते आणि शिस्तपालन प्रक्रियांमुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढल्याचा आढावा सादर करण्यात आला.
वित्त व कर विभागांमार्फत कर वसुली सुधारणा, थकबाकी व्यवस्थापन, खर्च नियंत्रण आणि ई-लेखा प्रणालीच्या माध्यमातून वित्तीय शिस्त बळकट करण्यावर भर देण्यात आल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता व आरोग्य विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या नागरी सेवांचा आढावाही यावेळी मांडण्यात आला.
हेही वाचा: सांगली–मिरज रेल्वे प्रवाशांना दिलासा; प्रजासत्ताक दिनानिमित्त धावणार विशेष रेल्वे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










