सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ न मिळणे, चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनुदान स्थगित होणे तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, महिलांच्या तक्रारींचे थेट निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन क्रमांकावर स्वतंत्र मदत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, योजनेशी संबंधित e-KYC अडचणी, हप्ता जमा न होणे, लाभ स्थितीबाबत शंका तसेच लाडकी बहीण योजनेशी संबंधित इतर कोणत्याही तक्रारी आता 181 हेल्पलाइनवर फोनद्वारे नोंदवता येणार आहेत. तक्रारींची नोंद घेऊन लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी कॉल ऑपरेटर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC सक्ती लागू झाल्यानंतर अनेक लाभार्थी महिलांना e-KYC प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. सांगली जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांनीही e-KYC अडचणींबाबत तक्रारी केल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांत e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाभ थांबल्याचेही निदर्शनास आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन महिला व बाल विकास विभागाने हेल्पलाइनच्या माध्यमातून थेट तक्रार निवारण व्यवस्था सुरू केली आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास महिलांनी 181 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा: पारदर्शक निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचे संबंधित यंत्रणांना निर्देश.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










