सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक जागृतीसाठी ‘सांगलीच्या भिंती बोलू लागल्यात’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील मुख्य रस्ते, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर स्वच्छता व पर्यावरण विषयक भित्तीचित्रे काढण्यात येत आहेत.
या भित्तीचित्रांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, पूर्वी दुर्लक्षित असलेले सार्वजनिक कोपरे, रस्त्याकडेच्या भिंती आता सामाजिक संदेश देणारी दृश्य माध्यमे बनत आहेत. हा उपक्रम स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान तसेच National Clean Air Programme (NCAP) अंतर्गत राबवला जात आहे.
भित्तीचित्रांमधून प्लास्टिकमुक्त शहर, वृक्षारोपण, पाणी बचत, ओला व सुका कचरा वर्गीकरण, झिरो वेस्ट संकल्पना, प्रदूषण नियंत्रण, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, सार्वजनिक वाहतूक तसेच आरोग्य व सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासंबंधी संदेश देण्यात येत आहेत.
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ जबाबदारी न राहता ती नागरिकांची सवय आणि सांगलीची संस्कृती बनावी, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. शब्दांशिवाय बोलणारी चित्रकला नागरिकांच्या मनावर सकारात्मक परिणाम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण संवर्धन अधिकारी अजित गुजराथी यांनी सांगितले की, दृश्य माध्यमांचा प्रभाव मोठा असून भित्तीचित्रांद्वारे दिला जाणारा स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल. नागरिकांच्या सहभागातूनच स्वच्छ आणि सुंदर सांगली साकार होईल, अस ते म्हणाले.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून टाकावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि सांगली स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
हेही वाचा: ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तासगाव तालुक्यातील एका गावाचा मतदानावर बहिष्कार.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










