सांगली : शहरातील धामणी रस्त्यावरील शांतिबन चौकाजवळ असलेल्या मयूर नर्सरीला लागलेल्या आगीत तरुण महिलेचा होरपळून मृत्यू झालेल्या घटनेचा तपास आता वेगळ्या दिशेने जात आहे. या प्रकरणात मृत महिलेचा पती पसार असून, त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन आणि विश्रामबाग पोलिसांची तीन अशी एकूण पाच पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मयूर नर्सरीला भीषण आग लागली होती. या आगीत नर्सरीत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या निकिता शिव मनगुळे-लोंढे (वय 25, रा. कागवाड, जि. बेळगाव) यांचा होरपळून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली होती.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनादरम्यान मृत महिलेच्या नाकातून व तोंडातून फेस आल्याचे निरीक्षणास आले आहे. या निरीक्षणामुळे आगीच्या वेळी निकिता जिवंत होती का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आगीच्या घटनेनंतर निकिताचा पती शिव मनगुळे-लोंढे हा घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागली त्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित होता की नाही, तसेच घटनेशी त्याचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नर्सरीतील पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी असल्याची माहितीही तपासा दरम्यान मिळाली आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्टसर्किट, अपघात किंवा अन्य कारणांमुळे आग लागली का, याचाही तपास सुरू आहे. साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा: मिरजेत बंद घर फोडून सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










