सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व इतर कर विभागाने थकबाकीदारांविरोधात राबविलेल्या वसुली मोहिमेतून काल दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात तब्ब्ल ३७.७३ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. या कारवाईत थकबाकीपोटी तीन मिळकतींवर सिल लावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये ९.९५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, एका मिळकतीवर सिल कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये १२.८२ लाख, तर प्रभाग समिती क्रमांक ३ मधून ६.०६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक ४ अंतर्गत ८.८९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, येथेही एका मिळकतीवर सिल कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान रोख व चेकद्वारे ३१.२५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. सिल कारवाई करण्यात आलेल्या मिळकतींची थकबाकी रक्कम ६.४७ लाख रुपये असून, एकूण तीन मिळकतींवर सिल कारवाई करण्यात आली आहे.
थकबाकीदारांनी स्वेच्छेने आपला मालमत्ता कर व इतर कर तत्काळ भरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कर थकबाकी न भरल्यास पुढील काळात कायदेशीर कारवाई अधिक कडकपणे राबविण्यात येईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: मातामृत्यू झाल्यास मुलांसाठी सांगली जिल्हा परिषदेची अनुदान योजना; कोण पात्र, कसा मिळतो लाभ?.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










