सांगली : सांगली शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णालयास भेट देऊन विचारपूस केली.
पालकमंत्री पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे जाऊन जखमींची तब्येत जाणून घेतली तसेच त्यांच्या उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी जखमींना धीर देत उपचारात कोणतीही कसूर राहू नये, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
घटनेतील जखमींवर उपचारासाठी आवश्यक असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी तसेच उपचार तत्काळ आणि प्रभावी पद्धतीने करण्यात यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, कृष्णामाई नदी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात घडलेल्या या घटनेत नागरिकांसह पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
हेही वाचा: सांगली महानगरपालिकेच्या वसुली मोहिमेतून एका दिवसात ३७.७३ लाखांची वसुली; तीन मिळकती सिल.
- कारगिल विजय दिनानिमित्त सांगलीत ३०० फूट तिरंगा पदयात्रा; वीर जवानांना अभिवादन
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम










