सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील नोकरभरती प्रक्रियेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सांगली जिल्हा बँकेला नोकरभरतीसाठी रिझर्व्ह बँक आणि शासनाची परवानगी मिळाल्यानंतर बँकेत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती.
शासनाने नोकरभरती प्रक्रिया ही फक्त आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या संस्थांमार्फतच राबवावी, असा आदेश दिला होता. तसेच, यापूर्वी अस्तित्वात असलेले सहा कंपन्यांचे पॅनल रद्द करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाचा आदेश रद्द करत संबंधित कंपन्यांना नैसर्गिक न्याय देण्याचे निर्देश दिले होते.
या निर्देशांनुसार समिती स्थापन करून संबंधित कंपन्यांची बाजू ऐकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, शासनाने घातलेल्या स्थगितीविरोधात सांगली जिल्हा बँकेने मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली असून, या प्रकरणातील पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात २,०३९ मतदान केंद्रे; ७ फेब्रुवारीला १८ लाख मतदार करणार मतदान.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









