सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ शांततेत पार पाडण्यासाठी सांगली जिल्ह्यात मतदान व मतमोजणीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने मतदानाच्या आधल्या दिवशी म्हणजेच ६ फेब्रुवारी, मतदानाचा दिवस ७ फेब्रुवारी, तसेच ९ फेब्रुवारीला मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री पूर्णतः बंद राहणार आहे.
मतदानाच्या अधला दिवस आणि मतदानाच्या दिवशी सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा आणि मिरज पंचायत समिती कार्यक्षेत्रात ही बंदी लागू राहणार आहे. मात्र, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्र यामधून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण सांगली जिल्ह्यात सर्व प्रकारचे मद्य व ताडी विक्री संपूर्ण दिवस बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा: १० वी १२ वी परीक्षा काळात केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी; सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










