सांगली : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात मुलांसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे तर मुलींसाठी 50 विद्यार्थिनी क्षमतेचे अशी दोन वसतिगृहे सुरू करण्यात आली असून या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली) येथे दि. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अधिक माहितीसाठी मुलांच्या वसतिगृहासाठी अधीक्षक (मोबा. 9763491019) तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी अधीक्षिका (मोबा. 8766954163) यांच्याशी संपर्क साधावा.
हेही वाचा: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौरपदी गजानन मगदूम यांनी पदभार स्वीकारला.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










