सांगली : सांगली शहरासाठी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या प्रकरणांबाबत झालेल्या बैठकीत एकूण 118 प्रकरणांपैकी 94 प्रकरणांना पात्रता देण्यात आली आहे.
तहसिलदार तथा संजय गांधी योजना सांगली शहरच्या अध्यक्ष शुभांगी कनवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी शाखेत पार पडली. बैठकीत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एकूण 85 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 64 प्रकरणे पात्र ठरविण्यात आली, तर 21 प्रकरणे अपात्र घोषित करण्यात आली.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत एकूण 33 प्रकरणांपैकी 30 प्रकरणांना पात्रता देण्यात आली असून 3 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. अशा प्रकारे दोन्ही योजनांमधील मिळून एकूण 118 पैकी 94 प्रकरणे पात्र ठरली.
या बैठकीस महसूल सहाय्यक संदीप पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. पुढील बैठक मार्च 2026 महिन्यात होणार असून संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात शासकीय वसतिगृहासाठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 फेब्रुवारी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










