सांगली : वाढत्या इंटरनेट वापराच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 10 फेब्रुवारी रोजी आयोजित “सुरक्षित इंटरनेट दिवस” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभर सेफर इंटरनेट डे “Safer Internet Day” साजरा केला जातो. यावर्षी स्मार्ट टेक, सेफ चॉईसेस – एक्स्प्लोरिंग द सेफ अँड रिस्पॉन्सिबल युज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स “Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of Artificial Intelligence (AI)” ही संकल्पना ठेवण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सायबर सुरक्षा, इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर शाखेचे कर्मचारी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, फिशिंग हल्ले, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन, डिजिटल स्वच्छता (Digital Hygiene) आणि बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा चे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
हेही वाचा: सांगलीत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेसाठी 118 पैकी 94 प्रकरणे पात्र.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










