सांगली : पोलिस तसेच टपाल खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगलीतील दोघांकडून 9 लाख 8 हजार 75 रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत कोंडिबा पवार (वय 50, रा. वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी याबाबत सुनील मधुकर पाटील (वय 53, रा. वसंतनगर, सांगली) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, संशयिताने पवार यांना टपाल खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 4 लाख 21 हजार 685 रुपये घेतले. तसेच पवार यांचे मित्र राजकुमार गणपती खोत (वय 41, रा. खणभाग, सांगली) यांना पोलिस खात्यात नोकरी लावतो असे सांगून 4 लाख 86 हजार 390 रुपये घेतल्याचा आरोप आहे.
मात्र, दोघांनाही नोकरी न लागल्याने त्यांनी संबंधिताकडे वारंवार चौकशी केली. पैसे परत मागूनही ते परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर श्रीकांत पवार यांनी संशयिताविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आली असून सांगली शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










