सांगली पोलिस भरतीत एका जागेसाठी 36 जणांची स्पर्धा; 59 पदांसाठी 2,140 उमेदवार पात्र

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
59 पदांसाठी झालेल्या सांगली पोलिस भरतीसाठी शारीरिक चाचणी देताना उमेदवार. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : सांगली पोलिस दलातील 59 रिक्त पदांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. शारीरिक चाचणीत 2,140 उमेदवार पात्र ठरले असून, सरासरी एका जागेसाठी सुमारे 36 जण स्पर्धेत आहेत.

डिसेंबर 2025 मध्ये जाहीर झालेल्या या भरतीसाठी एकूण 3,171 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. कागदपत्र पडताळणीनंतर 11 ते 13 फेब्रुवारीदरम्यान पोलिस क्रीडांगणावर शारीरिक चाचणी घेण्यात आली.

एकूण 2,326 उमेदवारांनी प्रत्यक्ष शारीरिक चाचणी दिली. त्यापैकी 2,140 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे अंतिम निवडीसाठी स्पर्धा आणखी चुरशीची होणार आहे.

महिला उमेदवारांपैकी 747 महिलांनी अर्ज केला होता. त्यापैकी 604 महिला उपस्थित राहिल्या आणि 542 महिला उमेदवार पात्र ठरल्या. पुरुष उमेदवारांपैकी 2,424 जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी 1,722 जण उपस्थित राहिले आणि 1,598 जण पात्र ठरले.

पात्र उमेदवारांची यादी सांगली पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणाला हरकत असल्यास 16 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ती नोंदवता येणार आहे.

भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीत ‘महारेशीम’ मोहीम सुरू; शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न, 11 मार्चपर्यंत नोंदणीची संधी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा