सांगली : शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध महापालिकेची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. सांगली बसस्थानक परिसरातील झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूमपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले सुमारे 22 अनधिकृत ओटे व शेड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
आज सकाळपासून अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई सुरू केली. रस्त्याला अडथळा ठरणारी बांधकामे हटवल्यानंतर परिसरातील हातगाडीधारक, फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनाही हटवण्यात आले. त्यामुळे बसस्थानक ते 100 फुटी रोडदरम्यानचा संपूर्ण मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

महापालिकेकडून संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती पण दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, काल विश्रामबाग ते आलदर चौक परिसरातील 67 अनधिकृत खोकी हटवून सांगली-मिरज मुख्य रस्ता मोकळा करण्यात आला होता. सलग दोन दिवस शहरातील प्रमुख मार्गांवर झालेल्या कारवाईमुळे सांगली महानगरपालिकेची अतिक्रमणांविरुद्धची मोहीम आता अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे.
रस्ता मोकळा झाल्याने बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा: मिरजेत दोन दिवस शिवजयंतीची रंगत; पोवाडे, मर्दानी खेळ आणि ‘श्रीमंतयोगी’ महानाट्य, सर्वांना मोफत प्रवेश.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









