सांगली : सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थी व शिक्षकांची नावे ‘नासा’च्या आर्टेमिस-2 (Artemis-2) चंद्र मोहिमेसाठी अधिकृतरीत्या नोंदवली गेली आहेत. ‘Send Your Name to the Moon’ या उपक्रमांतर्गत ही नावे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या यानासोबत डिजिटल स्वरूपात पाठवली जाणार आहेत.
नासाने या मोहिमेसाठी जगभरातील नागरिकांना ‘व्हर्च्युअल गेस्ट’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत वाटेगाव येथील शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नासाकडून ‘बोर्डिंग पास’ स्वरूपातील प्रमाणपत्रे देण्यात आले असून शाळेत त्यांचे वितरण करण्यात आले.
आर्टेमिस-2 मोहीम एप्रिल 2026 पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित होईल अशी अपेक्षा आहे. या मोहिमेत अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमामागे शिक्षक प्रसाद हसबनीस यांचा पुढाकार असून मुख्याध्यापक विकास पाटील यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर्टेमिस-2 मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शाळेच्या या सहभागाचे कौतुक केले आहे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










