कडेगाव : “सोने दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवत कडेपूर (ता. कडेगाव) येथे एका 60 वर्षीय वृद्धाची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात भोंदूबाबा व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तानाजी विष्णू मोहिते (वय 60, रा. तोंडोली, ता. कडेगाव) हे 8 फेब्रुवारी रोजी दुपारी कडेपूर–पुसेसावळी रस्त्यालगत उभे असताना तिथे एक मोटार आली, मोटारीतून सुमारे 70 वर्षीय वय असणारा अंगावर कपडे नसलेली अवस्था, डोक्याला भस्म लावलेले रूप धारण केलेला भोंदू बाबा आणि त्याचा एक साथीदार असे दोन जण गाडीतून खाली उतरले.
भोंदूबाबाने मोहिते यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना त्यांचे “सोन्याचे दागिने दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवले. भोंदूच्या बोलण्याला बळी पडून मोहिते यांनी हातातील 40 ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट आणि गळ्यातील 27 ग्रॅमची सोन्याची साखळी बाबाकडे दिली.
भोंदूबाबा व त्याच्या साथीदाराने मोहिते यांची दिशाभूल करत 67 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहिते यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा: मिरजेत आज ‘श्रीमंतयोगी’; सायं. 5 ते 8 बालगंधर्व नाट्यमंदिरात मोफत महानाट्य.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










