सांगली : शहरातील के. डायमंड मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, विजयपूर या संस्थेच्या सांगली व कवठेमहांकाळ शाखांसाठी विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 32 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2026 आहे.
व्यवस्थापनापासून लिपिक व फील्ड कामकाजाशी संबंधित पदांपर्यंत विविध जबाबदाऱ्यांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. असिस्टंट मॅनेजर पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असून संगणक ज्ञान अनिवार्य आहे. क्षेत्र अधिकारी आणि क्लार्क पदांसाठी कोणतीही पदवी चालणार असून संगणक हाताळणीचे ज्ञान अपेक्षित आहे. पिग्मी एजंट आणि शिपाई पदांसाठी किमान दहावी उत्तीर्ण पात्रता ठेवण्यात आली आहे.
भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून इच्छुकांनी आपला अर्ज, के. डायमंड मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि, विजयपूर. सांगली हायस्कूल रोड, बँक ऑफ बडोदासमोर, वखारभाग, सांगली – ४१६४१६. या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृव वेबसाईट kdiamondmultistate ला भेट द्या अथवा, 8355939898 किंवा 7977826884 या क्रमांकावर संपर्क साधा.
हेही वाचा: कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीतील द्राक्ष उत्पादकांना साडेचौदा लाखांचा फटका; माल नेला, पैसे नाहीत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










