सांगली : शिवजयंतीनिमित्त मारुती चौक परिसरात झालेल्या कार्यक्रमांनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवली.
मारुती चौक येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात विशेष स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः झाडू हातात घेत स्वच्छतेत सहभाग घेतला. उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रशासन आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या कार्यक्रमांनंतर अनेकदा प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, फुले आणि इतर कचरा रस्त्यावर विखुरलेला दिसतो. त्यामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. अस्वछता टाळण्यासाठी ‘कचरामुक्त उत्सव’ ही संकल्पना पुढे नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही श्रमदान केले.
दरम्यान, नागरिकांनीही उत्सवानंतर स्वच्छतेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा: नोकरीची संधी! सांगलीतील क्रेडिट सोसायटीत 32 पदांसाठी भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी संधी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










