सांगली : सासरी सोडण्याच्या बहाण्याने मोटारीतून घेऊन जात असताना विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुण्यातील दोघांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, 14 सप्टेंबर 2025 रोजी पीडितेला सासरी नांदण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून संशयितांनी तिला मोटारीत बसविले. सांगली बायपास परिसरात निर्जन ठिकाणी वाहन थांबवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर काही काळ पीडितेने हा प्रकार कुणालाच सांगितला नव्हता. मात्र कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर तिने पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: शहरात मोकाट कुत्र्यांवर कारवाई नेमकी कुठे? डास फवारणी किती प्रभावी? मनपा आरोग्य कामकाजावर प्रश्नचिन्ह.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










