सांगली : रविवारी भाजी मंडईत गवारीचा दर 270 रुपये ते 280 रुपये किलोवर पोहोचला असून, शहरातील काही भागात त्यापेक्षा स्वस्त दरात चिकन विक्री होत असल्याने ग्राहकांमध्ये चर्चा रंगली आहे. गवारीपेक्षा चिकन स्वस्त झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
रविवारी संध्याकाळी भाजी मंडईत गवारीचा दर 270 ते 280 रुपये किलो होता. बाजारातील आवक कमी असल्याने गेल्या महिनाभरापासून गवारीचे दर तेजीत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, बंदरी गवारीचा दर 140 ते 160 रुपये किलो दरम्यान आहे.
दरम्यान, सांगलीतील शंभर फुटी रोड परिसरातील एका चिकन विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी चिकनचा दर 260 रुपये किलो आहे. “संध्याकाळी दरात बदल होऊ शकतो,” असेही संबंधित विक्रेत्याने सांगितले.
गवारी आणि चिकनचा दर जवळपास समान झाल्याने ग्राहकांमध्ये “गवारी स्वस्त की चिकन?”, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. सणासुदीचा काळ, आवक कमी आणि हवामानातील बदल यामुळे काही भाज्यांचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
भाज्यांच्या दरवाढीचा सर्वसामान्य सांगलीकरांच्या बजेटवर परिणाम होत आहे.
हेही वाचा: विश्रामबाग मंगळवार बाजार चौकात नाला तुंबण्याची भीती; नाल्यात झाडी वाढल्याने सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










