सांगली : माधवनगर येथील सोमवार पेठ परिसरात घरासमोर उभी केलेली अॅक्टिवा मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली गुंजकर (वय 26) या माधवनगर येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. त्या आर.के.एच. हॉस्पिटल माधवनगर येथे नर्सिंगचे काम करतात.
दि. 2 मार्च रोजी रात्री बाहेर जेवण करून त्या रात्री सुमारे 12.10 वाजता घरी परतल्या. त्यावेळी त्यांनी आपली राखाडी रंगाची होंडा अॅक्टिवा 6G (MH-09 GS-2766) ही दुचाकी घरासमोर लावून हँडल लॉक करून ठेवली होती.
मात्र सकाळी सुमारे 9 वाजता कामावर जाण्यासाठी त्या खाली आल्यावर दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही गाडी न मिळाल्याने संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
चोरीस गेलेल्या अॅक्टिवाची किंमत सुमारे 40 हजार रुपये असून संजयनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
येथे वाचा: Sangli Crime News Today.
हेही वाचा: वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










