सांगली : ‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत ६८१ आरोग्य शिबिरे; ३६ हजार नागरिकांची तपासणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli Shri Ganesha Health Camps 2025

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात तब्बल ६८१ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून ३६ हजार ७७८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून, विविध आजारांनी ग्रस्त २ हजार २७६ रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे संदर्भित करण्यात आले.

२७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, ३६० नागरिकांनी रक्तदान केले, तर २६९६ नागरिकांना आभा कार्ड वितरित करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाच्या डॉ. मनिषा पाटील यांच्या समन्वयाने आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही शिबिरे घेण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या अभियानातून हजारो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचाराची संधी उपलब्ध झाली. स्थानिक गणेश मंडळांनीही या उपक्रमासाठी व्यापक जनजागृती करून नागरिकांना सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.

🔴 हेही वाचा 👉 लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू; इस्लामपूर बसस्थानकाजवळ दुचाकीला मोटारीची धडक.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.