सांगली : घरगुती एलपीजी गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सी आणि हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत 45 गॅस एजन्सी आणि 40 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे.
या तपासणीदरम्यान 71 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध गॅस रिफिलिंगप्रकरणी सांगलीतील एक आणि मिरजमधील दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएलचा 2784 मेट्रिक टन, बीपीसीएलचा 245 मेट्रिक टन आणि आयओसीएलचा 60 मेट्रिक टन इतका गॅस साठा उपलब्ध असल्याने घरगुती गॅस ग्राहकांना पुरवठा सुरळीत राहणार आहे.
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर किंवा गैरमार्गाने वितरण आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा: सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या तक्रारी; खासदार विशाल पाटील यांचा अधिकाऱ्यांना जाब.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










