सांगली : कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळावा यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पावसाचे पाणी साठवून शेतीसाठी वापरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शेततळ्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवता येते आणि दुष्काळी परिस्थितीतही पिकांना पाणी देता येते. त्यामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याने यापूर्वी शासनाच्या शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
इच्छुक शेतकरी www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हेही वाचा: दृष्टी नसली तरी जिद्द मोठी! सांगलीत अंध मुलांचा थरारक क्रिकेट सामना; शिवनेरी संघाचा 7 धावांनी विजय.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










