सांगली : दृष्टी नसली तरी जिद्दीच्या जोरावर अंध मुलांनी खेळलेला क्रिकेट सामना सांगलीकरांसाठी प्रेरणादायी ठरला. कुपवाड येथील नव कृष्णा व्हॅली इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम शिवनेरीने टीम रायगडवर 7 धावांनी विजय मिळवला.
या स्पर्धेत राज्यातील 26 अंध खेळाडूंनी सहभाग घेतला होता. दोन्ही संघांमध्ये 15 षटकांचा सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना टीम शिवनेरीने 4 विकेट गमावून 117 धावा केल्या. त्यास प्रत्युत्तर देताना टीम रायगडचा संघ 110 धावांवर सर्वबाद झाला.
टीम शिवनेरीकडून संकेत जाधव यांनी तर टीम रायगडकडून चिन्मय पारे यांनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. या सामन्यात विपुल साळुंखे यांना मॅन ऑफ द मॅच, तर साक्षांत पवार बेस्ट गोलंदाज आणि अनूप आहिर बेस्ट बॅटसमन ठरले.
सामन्यावेळी अंध खेळाडूंनी आवाजाच्या आधारे चेंडूचा अंदाज घेत फलंदाजी व गोलंदाजी करत दाखवलेले कौशल्य पाहून मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
या उपक्रमाला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून फलंदाजी करत मुलांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा: सांगलीत दर 15 दिवसांनी महास्वच्छता मोहीम; सांगलीवाडीत कचरा साफसफाई अभियान.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










