Sangli Viral Video : सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा जिपोत्सव कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात त्यांनी ‘हेराफेरी’ चित्रपटातील एक लोकप्रिय कॉमेडी सीन सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
सामान्यतः प्रशासकीय कामकाज, बैठका आणि फाइल्समध्ये व्यस्त असणारे अधिकारी मंचावर असा वेगळा अंदाज सादर करताना पाहून उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
‘जिपोत्सव’ या कार्यक्रमात नरवाडे यांनी दिलखुलास शैलीत केलेल्या सादरीकरणामुळे सभागृहात हास्याचे फवारे उडाले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.
दरम्यान, या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून अनेकांनी त्यांच्या या वेगळ्या अंदाजाचे कौतुक केले आहे. काही युजर्सनी “Super performance sir”, “Natural performance” आणि “सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व” अशा प्रतिक्रिया देत नरवाडे यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आहे.
व्हिडिओ पाहा (Sangli Viral Video) :
हेही वाचा: कोरडवाहू शेतीला दिलासा; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज सुरू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










