सांगली : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम सुरू केली असून दक्षता आणि फिरत्या पथकांनी विविध ठिकाणी गॅस एजन्सी व हॉटेल्सची तपासणी केली.
सांगली, मिरज, उरूण ईश्वरपूर आणि जत या भागांमध्ये गॅस एजन्सी तसेच व्यावसायिक वापराच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. मिरजमधील काही हॉटेल्समध्ये व्यावसायिक सिलेंडर वापराबाबतही तपासणी करण्यात आली.
घरगुती एलपीजीचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एचपीसीएलचा 1713 मेट्रिक टन, बीपीसीएलचा 94.9 मेट्रिक टन आणि आयओसीएलचा 58 मेट्रिक टन साठा उपलब्ध असून आणखी 1195.6 मेट्रिक टन गॅस जिल्ह्याकडे येत आहे.
हेही वाचा: मिरजेत प्लास्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई; ८ व्यावसायिकांना २६ हजारांचा दंड.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










