सांगली : जिल्ह्यातील महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून 23 मार्च रोजी सांगलीत विशेष महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 300 पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सोमवार, 23 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नेमिनाथनगर येथील महाविद्यालयात होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात मिलेनियम मोटर्स, एलआयसी ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, मुथुट मायक्रोफिन, सह्याद्री मोटर्स, आयआयएफएल फायनान्स आदी कंपन्यांकडून विविध पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या 18 ते 50 वयोगटातील महिलांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखतीस येताना आपली सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – ०२३३ २९९०३८३
हेही वाचा: मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगलीला निघाले… शिरढोण येथे दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










